नवी दिल्ली : स्मार्टफोन युजर्सना अनेकदा भेडसावणारी समस्या म्हणजे फोन हँग होणं. अनेकदा अतिरिक्त अॅप्स आणि बॅकग्राऊंडला सुरु असणारे अॅप्स यांसारख्या कारणांमुळे मोबाईल हँग होण्याची समस्या जाणवू शकते. त्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही. पण काही सेटिंग्ज तुमच्या फोनमध्ये केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
सर्वप्रथम फोन Restart करा. हे मेमरी साफ करते आणि System Reset करण्यात मदत करते. तसेच तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम आणि सर्व ॲप्स Updated असल्याची खात्री करा. अनावश्यक ॲप्स अनइन्स्टॉल करावेत. तुम्ही वापरत नसलेले ॲप्स अनइन्स्टॉल करण्याचा सल्ला दिला जातो. हे अॅप्स मेमरी आणि स्टोरेज मोकळे करण्यात मदत करू शकतील.
स्टोरेज स्पेस वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. कारण, याच स्पेसमुळे मोबाईल हँग होण्याची समस्या जाणवू शकते. जर स्टोरेज भरली असेल तर काही फाईल्स, फोटो, व्हिडिओ डिलिट करावीत किंवा तुमच्या मेमरी कार्ड स्टोरेजमध्ये ट्रान्सफर करावेत. या सेटिंग्जने बराचसा परिणाम जाणवेल. याशिवाय, कॅशे क्लिन करा. त्यासाठी ॲप्सचा कॅशे डेटा साफ करा. तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन स्टोरेज-कॅशेड डेटा-निवडून कॅशे साफ करू शकता.