वाघोली : 17 वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ओमान (जॉर्डन) येथे 22 ते 30 जून दरम्यान होत आहे. या आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाची निवड चाचणी स्पर्धा दिनांक 7 जून रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या निवड चाचणीत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची निवड चाचणी 2 जून रोजी हनुमान आखाडा पुणे येथे झाली. या निवड चाचणीत जाणता राजा कुस्ती केंद्रांच्या 5 कुस्तीगीरांनी नेत्रदीपक कामगिरी करत महाराष्ट्राच्या कुस्ती संघात स्थान मिळवले.
या कुस्तीगीरांना लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती केंद्राचे एन.आय.एस.कुस्ती कोच महिपत कुंडु, पै.सुरज तोमर व पै.संतोष यादव यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या कुस्तीगीरांचे अभिनंदन जाणता राजा कुस्ती केंद्राचे संस्थापक तथा कुस्तीगीर संघाचे पै.संदिप भोंडवे, प्रमुख सचिन पलांडे यांनी केले.
फ्रीस्टाईल :
45 किलो-पै.वक्रतुंड फदाले
48 किलो-पै.विशाल शिळीमकर
51 किलो-पै.रोहन भडांगे
65 किलो- पै. ओमकार काटकर.
ग्रिकोरोमन :
51 किलो-पै.साईनाथ पारधी