पुणे : शहरात पुढील सहा दिवस दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. शहरात मान्सून येत्या ६ जूनच्या आसपास दाखल होणार आहे. त्यामुळे सध्या पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण आहे. शहरात कमाल तापमान ३६.६ अंश सेल्सिअस इतके होते. सध्या कडाक्याच्या उन्हाबरोबर ढगाळ हवामान आहे. दुपारपर्यंत उन्हाचा चटका बसत आहे.
रविवारी किमान तापमान २५.१ अंश सेल्सिअस नोंदविले. उपनगरातील तापमानात बदल होत असून, किंचित घट झाली आहे. मगरपट्टा, वडगावशेरी येथे ३८ अंश सेल्सिअस तापमान होते. तर, कोरेगाव पार्क ३७.९, हडपसर ३६.६, एनडीए येथे ३६.२, तर पाषाण येथे ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. येत्या ३ ते ८ जूनदरम्यान दुपारनंतर अंशतः ढगाळ राहणार असून, मेघगर्जना, विजांच्या कंडकडाटासह पावसाची शक्यता आहे.