पुणे : कल्याणी नगर अपघातप्रकरणी आरोपी मुलाच्या रक्त तपासणीच्या अहवाल फेरफार केल्याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. ससूनमधील या ब्लड फेरफार प्रकरणात पोलिसांनी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि डेड हाऊसचा शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना अटक केली आहे.
आता अटकेत असलेल्या डॉ. श्रीहरी हळनोरने मोठी कबुली दिली आहे. त्यामुळे डॉ. अजय तावरेच्या अडचणी वाढणार आहेत. डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यावर डॉ. अजय तावरेने दबाव टाकला होता. डॉ. अजय तावरे व विशाल अग्रवाल यांचे बोलणं झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी डॉ. तावरे यांनी माझ्यावर दबाव टाकला, अशी हळनोरने कबुली दिली आहे.
डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांचे फोनवर बोलणे झाल्यानंतर मला रक्ताचे नमुने बदल्ल्यांसाठी डॉ. अजय तावरे यांनी दबाव टाकल्यामुळे डॉ. हळनोर यांनी सांगितले. रक्त बदलणं, माझ्या मनाला ते पटत नव्हत. माझ्याकडून मोठी चूक झाल्याच मला वाटत होतं अशी डॉ. श्रीहरी हळनोरने सांगितले. डॉ. श्रीहरी हळनोर सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे.