पुणे : नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवचा काही भाग व्यापला आहे. तर मान्सूनला पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. परिणामी, पुढील पाच दिवस कोकण-गोव्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, धाराशिव यांसह अन्य काही जिल्ह्यांमध्येही दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.