पुणे : कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन केसमुळे राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत असून पुणे कार अपघात प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलं आहे. या प्रकरणात ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. यातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोळ यांच्या जीविताला धोका आहे. अटकेत असलेल्या अजय तावरे याने माझ्याकडे भरपूर नावे आहेत कोणालाही सोडणार नसल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टरांच्या जीवाला धोका असू शकतो असे म्हटले आहे.
4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन.
पण तोवर डॉ अजय तावरे च्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते. @PTI_News @ANI— SushmaTai Andhare???? (@andharesushama) May 29, 2024
येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन. पण तोपर्यंत डॉ. अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटत असल्याचे यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.
पोर्शे अपघात प्रकरणात अनेक मोठे गोष्टी घडल्या आहेत. 12 तासाच्या आत जामीन मिळाला, रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, आरोपील वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही. त्यामुळे खात्याचा सावळा गोंधळ तर आहे. या सगळ्या संबंधाने विचार केला तर निश्चितच तावरेंच्या जीवाला धोका आहे.अजय तावरे हा रक्ताचे नमुने बदलणे, यापुरते मर्यादित नाहीत. गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं, असा दावा सुषमा अंधारेंनी केला आहे.