लोणी काळभोर, (पुणे) : बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, सर्जनशील, शारीरिक, नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण चांगल्या प्रकारे दिले जाते. तसेच निसर्ग संपन्न वातावरण, देखणी वास्तू, विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा, क्रीडा संस्कृती जोपासणारे सुसज्ज मैदान असल्याने कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पांडव दंड रस्त्याजवळ असलेले रेनबो इंटरनॅशनल स्कूल हे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे या इंगजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांची नेहमीच चढाओढ लागत असते.
लोणी काळभोर परिसरात एक चांगलं शिक्षण देणारी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवणारी, इंग्रजी माध्यमातील शाळा हवी. असा विचार नितीन काळभोर यांच्या मनात आला. नितीन काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे स्वप्न सन 2016 साली रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने प्रत्यक्षात आणलं.
रेनबो इंटरनॅशनल स्कूलची सुरवात 12 फूट बाय 15 फूट अशा 5 खोल्यामध्ये झाली. आता हे शैक्षणिक संकुल दोन एकरात पसरले आहे. या संकुलात स्मार्ट क्लास रूम, प्रयोगशाळा, लायब्ररी, बहुउद्देशीय हॉल, संगीत कक्ष, वाचन कक्ष यांसारखी दोलायमान पर्यायी शिक्षणाची जागा कॅम्पसमध्ये आहेत. या शैक्षणिक संकुलात आज सुमारे 700 हून अधिक विद्यार्थी नर्सरी ते दहावीपर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे शिक्षण घेत आहेत.
संस्थेचा पाया उभारताना चांगले शिक्षक, झोकून देऊन काम करणारा कार्यालयीन सहकाऱ्यांचा सहभाग महत्वाचा होता. संस्थेच्या आवारात प्रवेश करताच प्रशस्त लॉन दिसून येते. शाळेला बसची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे लोणी काळभोरसह उरुळी कांचन, थेऊर, कुंजीरवाडी, शेवाळवाडी, फुरसुंगी, हडपसर या भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शाळेची ओढ लागणे म्हणजे काय, हे रेनबो इंटरनॅशनल स्कूल च्या मुलांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहून समजते.
शाळेला भव्य क्रिकेट, फुटबॉल मैदान, साहसी खेळांचे मैदान, स्केटिंग रिंक, स्विमिंग पूल अशा क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर घोडेस्वारी, रायफल शम यासारख्या उपक्रमात विद्यार्थी प्रशिक्षित होताना दिसतात. याचबरोबर शाळेत संगीत, नृत्य, कला यांचेही प्रशिक्षण दिलं जातं. शाळेने विद्यार्थ्यांसाठी टेंब लॅब ही संकल्पनासुद्धा आणली आहे. त्यात लोड केलेली व्याख्याने, विद्यार्थी पाहतात, ऐकतात. आधुनिक उपकरणामुळे विद्यार्थी ह्या लॅब मध्ये आवडीने जातात व शिकतात. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांना मार्गदर्शन करायला तज्ञ शिक्षकवर्ग असतो.
शाळेसारखे दुसरे मंदिर नाही आणि विद्यार्थ्यांसारखा दुसरा देव नाही. विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू असतो. आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे संकुल उभारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर समाधान वाटते. ज्ञानदानाचे प्रवित्र काम माझ्या हातून घडले. त्यामुळे मी स्वत: भाग्यवान मानतो. तसेच भविष्यात अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
नितीन काळभोर – संस्थापक/अध्यक्ष, रेनबो इंटरनॅशनल स्कूल, लोणी काळभोर