उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 93.33 टक्के लागला आहे. अशी माहिती संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. 27) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विद्यालयातील 30 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 28 विद्यार्थी पास झाले आहेत.
प्रथम तीन आलेले विद्यार्थी..
नेहा सुरेश भोपळे 90.40 टक्के, गौरव विष्णू दाभाडे 79.60 टक्के, आनंद सुरेश बांगर 74.80 टक्के, अशी गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
विद्यार्थ्यांच्या या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव अजिंक्य कांचन, संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे, प्राचार्य रोहिणी जगताप, कोतवाल, परभणे सर, संपूर्ण स्टाप यांनी विद्यार्थांचे अभिनंद केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.