लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.27) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील मुक्ताई मेमोरियल स्कूलने सलग तिसऱ्यांदा 100 टक्के निकाल लावण्याची यशस्वी परंपरा जपली आहे. विद्यार्थिनी प्रांजल काळभोर हिने 92.40 टक्के मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती मुख्याध्यापिका महेंद्र धुमाळ यांनी दिली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी विद्यालयाचे विद्यार्थी बसले होते. यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यामुळे विद्यालयाचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे कुंजीरवाडी व लोणी काळभोर परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
विद्यालयाची विद्यार्थिनी प्रांजल सोपान काळभोर हिने 92.40% मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विद्यार्थी संस्कार संतोष धुमाळ याने 91.40% मिळवून द्वितीय तर पूर्वा सुनील चोरगे हिने 90.40% मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. प्राजक्ता राहुल शेळके हिने 90.20 टक्के गुण मिळवून चतूर्था क्रमांक तर समृद्धी सुनील कुंजीर, सृष्टी शांताराम कुंजीर व पूर्वा किशोर धुमाळ या तिन्ही ना आणुक्रमे 86.60% मिळाले आहेत. अशा प्रकारे यशस्वी टक्केवारी प्राप्त करत विद्यार्थ्यांनी यशाचा आलेख उंचाविला आहे. तसेच विद्यालयाच्या 28 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्यता मिळाली आहे. तर पंधरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, सलग तीन वर्ष 100 टक्के निकाल लावण्याची परंपरा विद्यालयाने जपली आहे. यासाठी विशेषता सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले आहे. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे दिपाली धुमाळ, विकास धुमाळ यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.