लोणी काळभोर, (पुणे) : स्वर्गीय आण्णासाहेब मगर स्मारक शिक्षण निधी संचालित थेऊर (ता. हवेली) येथील यशवंतराव मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के तर, चिंतामणी विद्या मंदिराचा निकाल ७९.७१ टक्के लागला आहे. तसेच ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचाही निकाल १०० टक्के लागला आहे. अशी माहिती प्राचार्य बाळासाहेब नेवाळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये चिंतामणी विद्यालयाचे ७९ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल मंडळाच्या वतीने सोमवारी (ता.२७) दुपारी १ वाजण्याच्या सुमारस ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यातील ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा विद्यार्थी अमर दगडू गरींबे याने ८७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वैष्णवी बाबासाहेब आखाडे हिने ८२.२० टक्के मिळवून द्वितीय तर तनुजा दत्तात्रय बडदे हिने ८१.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
थेऊर (ता. हवेली) येथील यशवंतराव मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. रौनक राकेश गुप्ता याने ९१.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर जयेश संजय जेठीथोर याने ८४ टक्के गुण मिळवून द्वितीय तर संस्कृती संजय मांजरे हिने ८०.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी विकास पवार हिने ९१.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अखिलेश नवनाथ गायकवाड याने ९०.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर सायली अमृत सगर हिने ९०.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे थेऊरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. तर उर्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.