पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघाताप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या काही मुद्यांवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात त्याला पिझ्झा देण्यात आला. तसेच अपघातानंतर ११ तासानंतरही त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले नव्हते, असं आरोप पुण्याचे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला होता.
नेमकं काय म्हणाले धंगेकर?
रवींद्र धंगेकर म्हणाले की, काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. त्यातली पहिली बाब म्हणजे, अपघाताची घटना घडल्यानंतर पहिल्या एफआयआरमध्ये कलम ३०४ चा उल्लेख नाही. अर्थात ही येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी शोधलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर कलम ३०४ अ आणि कलम ३०४ ची नोंद करण्यात आली.
पुढे म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांना गुन्हा दाखल केल्याची पहिली प्रत बदलण्याबाबत महिती देण्यात आली नव्हती का? की त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन आणि त्या बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? आपलं पुणे शहर वाचवण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणं अत्यंत गरजेचं आहे. अधिकारी – मंत्री तर निघून जातील. पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्यातील पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचं काम करेल, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटल आहे.
लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच !
कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत… https://t.co/22w6GQgmbW pic.twitter.com/MpO0QVQkUn
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) May 22, 2024
काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत.
१) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी… pic.twitter.com/2fbc73RvBo— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 22, 2024
रवींद्र धंगेकरांच्या टीकेला मुरलीधर मोहोळांचे उत्तर
रवींद्र धंगेकरांच्या या टीकेनंतर पुणे लोकसभेचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोहोळ म्हणाले की, लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच!
मोहोळ पुढे म्हणाले, कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग ते प्रकरण न्यायालयात जाते. मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम ३०४ हे पहिल्यापासून लावले आहे. यासह मोहोळ यांनी एफआयआरची १९ मे रोजीची प्रत शेअर केली आहे. ही १९ तारखेची प्रत पाहा आणि ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत, असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकरांना लगावला.