पुणे : येथील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने विशाल अग्रवाल यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालबरोबरच आणखी दोघांनाही 24 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
अपघातानंतर विशाल अग्रवाल हे पसार झाले होते. त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आले होते. आज त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.