नवी दिल्ली : जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, सरकार तुम्हाला एक उत्तम संधी देत आहे. याद्वारे, कमी गुंतवणुकीत चांगली कमाई सुरू होऊ शकते. या योजनेचे नाव आहे पीएम भारतीय जन औषधी केंद्र.
पीएम भारतीय जन औषधी केंद्र ही एक केंद्र सरकारची योजना आहे. या केंद्राची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे तुमच्यासाठी एक कमाईचे एक उत्तम साधन ठरू शकते. कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देणे हा या योजनेमागे सरकारचा उद्देश आहे. आतापर्यंत देशात 10 हजारांहून अधिक पीएम जन औषधी केंद्रे उघडण्यात आली असून, त्यांची संख्या वाढवण्यावर सरकार भर देत आहे. या औषध केंद्रांमध्ये 1800 प्रकारची औषधे आणि 285 वैद्यकीय उपकरणे ठेवण्यात आली आहेत.
पीएम जन औषधी केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यासाठी 5000 रुपये खर्च करावे लागतील. येथे लक्षात ठेवा की, ही केंद्रे उघडण्यासाठी अर्जदाराकडे डी फॉर्म आणि बी फॉर्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
याशिवाय, तुमच्याकडे केंद्र उघडण्यासाठी पुरेशी जागा असावी. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 120 चौरस फूट निश्चित करण्यात आले आहे. विशेष श्रेणी आणि अर्ज करणाऱ्यांना अर्ज प्रक्रियेदरम्यान सूट दिली जाईल. याच्या अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या वेबसाईटवरूनही माहिती घेता येऊ शकणार आहे.