पुणे : ओळखीच्या तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊन त्याचा व्हिडिओ पसरविण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी लुटले ३४ लाख रुपये लुटणाऱ्या तरूणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर याप्रकरणी पुलगेट येथे राहणाऱ्या २२ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , फिर्यादी यांची सोहेल सय्यद याच्याबरोबर ओळख होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
फिर्यादी युवती सोहेल याच्या घरी गेली असताना त्याने शितपेयातून तिला गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध झाल्यावर त्याने तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ काढला. आणि व्हायरल करेल, अशी धमकी देऊन शिवीगाळ करून मारहाण केली.
तसेच फिर्यादीसोबत वेळोवेळी संबंध ठेवून तिचा विश्वास संपादन केला. त्त्यानंतर तिचा फ्लॅट विक्री करून विक्रीचे पैसे, बचतीचे आणि तसेच पगाराचे पैसे असे एकूण ३३ लाख ९२ हजार ७२१ रुपये वेळोवेळी घेऊन ते परत न करता फसवणूक केली. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रात नोंदविली.
त्यावरुन पोलिसांनी सोहेल अजीम सय्यद (वय ३२), अनीम सय्यद, रकैया अलीम सय्यद आणि अहमद अजीम सय्यद (सर्व रा. ईशा हाईटस, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला आहे. हा प्रकार २०१७ ते २०१९ दरम्यान घडला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस तपास करीत आहेत.