पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे-बालासोर दरम्यान अतिरिक्त सुपर फास्ट विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-बालासोर (ट्रेन क्र.०१४५१) ही सुपरफास्ट विशेष गाडी १८ मे रोजी पुण्याहून सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी बालासोरला पोहोचणार आहे. तर, बालासोर-पुणे (ट्रेन क्र.०१४५२) ही सुपरफास्ट विशेष गाडी २० मे रोजी बालासोर येथून सकाळी ९ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, शक्ती, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चकरधरपूर, टाटानगर, खरगपूर या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.