पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात अल्पवयीन मुलिओवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथे डिसेंबर २०२३ ते ८ मे २०२४ या काळात घडला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीने ९ मे रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरून दिपक संजय भैरवा (२०, रा. पाली, ता. जि. पाली, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी यांची डिसेंबर २०२३ मध्ये ओळख झाली. त्या ओळखीतून ते दोघे एकमेकांचे मित्र झाले. त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तु मला खुप आवडते, आपण दोघे लग्न करु, सेटल होऊ असे बोलून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.