पुणे : पुण्यातील एक रेस्टॉरंट दिव्यांगांना नोकरी देत आहे. यामुळे या रेस्टॉरंटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. तुम्हाला माहिती आहे का? तर जाणून घ्या या रेस्टॉरंटचे नाव काय आहे ते.
पुणे शहरातील एफसी रोडवर असलेले टेरासिन-किचन आणि बार असे त्या रेस्टॉरंटचे नाव आहे. या रेस्टॉरंटमध्ये दिव्यांग व्यक्तींना कामासाठी ठेवण्यात आले आहे. सर्व कर्मचारी ऐकण्यात आणि बोलण्यात कमजोर आहेत. हॉटेलचे कर्मचारी सदस्य ग्राहकांशी सांकेतिक भाषेत बोलतात आणि त्यांच्या ऑर्डर घेतात. यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसतंय की, मेनू कार्डमधील प्रत्येक डिशमध्ये सांकेतिक भाषाही असते. तसेच ऑर्डर देण्यासाठी ग्राहकांना त्या डिशची सांकेतिक भाषा दाखवावी लागते.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
दरम्यान, या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये मिठाईपासून खाण्यापिण्यापर्यंत अनेक पर्याय आहेत. रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. या शारीरिकदृष्ट्या विकलांग कर्मचारी सदस्यांना सांकेतिक भाषेत बोलणे खूप सोपे आहे, जसे की आपण मुलांशी संकेतांद्वारे बोलतो. तसेच वेबसाइटवर रेस्टॉरंटचे वर्णन “सामाजिकदृष्ट्या जागरूक चळवळ” आणि “समानतेचा” प्रचार करण्याचा प्रयत्न म्हणून सांगण्यात आले आहे.
डॉ सोनम कापसे म्हणाल्या, “सर्व कर्मचारी हे 21 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि ते महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या शेतकऱ्यांची मुले आहेत. आम्ही या शेतकऱ्यांकडून रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणार्या बाजरीसारखे सेंद्रिय खाद्यपदार्थ देखील मिळवत आहोत.” बहु-अपंग कर्मचारी नियुक्त करणारे हे भारतातील पहिले रेस्टॉरंट आहे. याशिवाय, रेस्टॉरंटला इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी कौन्सिल, लंडनकडून ‘हॉस्पिटॅलिटी विथ अ कॉज’ पुरस्कारही मिळाला आहे.