पुणे : पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) प्रशासनाला आज (सोमवार ६ मे) लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या पुण्यतिथीचा विसर पडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. सायंकाळी चार वाजल्यानंतर विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग आल्याचे समजले.
यावेळी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समिती पीएचडी संशोधक आणि समन्वयक राहूल ससाणे म्हणाले, “हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. एकीकडे फुले, शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे जाणीवपूर्वक छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीचे विस्मरण करायचे.
आम्ही समितीच्या वतीने पुण्यतिथीची आठवण करून देत या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. अखेर सायंकाळी चार नंतर कुलगुरू सुरेश गोसावी, प्र कुलगुरू पराग काळकर आणि कुलसचिव विजय खरे यांनी पुष्पहार अर्पण करुन छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी साजरी केली.”
या संदर्भात कुलगुरू, प्र कुलगुरू आणि कुलसचिवांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.