उरुळी कांचन, (पुणे) : आपल्या प्रिय जणांची अस्थी किंवा रक्षा विसर्जन करताना आपण अतिशय संवेदनशील असतो. त्यांच्या अस्थी विसर्जित करताना शक्यतो नदीपात्रात अथवा वाहत्या पाण्यात करतो. हे करण्यामागे आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी हा सारा प्रपंच असतो. मात्र, याला अपवाद ठरले आहे ते उरुळी कांचन येथील जेष्ठ पत्रकार सुनील जगताप यांचा परिवार यामुळे परिसरातील ग्रामस्थ व जगताप कुटुंबाचे कौतुक होत आहे.
सुनील जगताप यांचे वडील जयवंतराव बळवंतराव जगताप यांचे नुकतेच वयाच्या ९३ व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्या पश्चात सहा मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. मात्र या परिवाराने पारंपारिक रुढी परंपरा बाजूला ठेवत अस्थी पाण्यात सोडण्याऐवजी वृक्षारोपणासाठी वापरल्या आहेत. या अस्थी व रक्षेचा वापर करून राहत्या घराच्या प्रांगणात आंबा व नारळाची सहा रोपे वडीलांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी लावण्याचा निर्णय घेतला व तेराव्याच्या दिवशी प्रत्यक्षात तीन आंब्याच्या व तीन नारळाच्या रोपांची लागवड करुन मनातील संकल्पनेला मूर्त स्वरूप देत आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
यामुळे परिसरातील ग्रामस्थ व जगताप कुटुंबाचे कौतुक होत आहे. या अस्थी व रक्षेचा वापर करून राहत्या घराच्या प्रांगणात आंबा व नारळाची सहा रोपे वडीलांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून पुढील काही वर्षात एक मोठा वृक्ष नव्या पिढीला सावली आणि फळे देईल व त्यांच्या आठवणी पुढील पिढीला होत राहील.
सुनील जगताप यांचे वडील जयवंतराव बळवंतराव जगताप यांचे नुकतेच वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. वडिलांच्या अस्थी शिरीष, अनिल, सुनील, संदेश, किरण व प्रकाश या सहा भावांनी अस्थी पाण्यात विसर्जित न करता या अस्थी व रक्षेचा वापर करून राहत्या घराच्या प्रांगणात आंबा व नारळाची सहा रोपे वडीलांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी लावण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, तेराव्याच्या दिवशी प्रत्यक्षात तीन आंब्याच्या व तीन नारळाच्या रोपांची लागवड करुन मनातील संकल्पनेला मूर्त स्वरूप देत आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या वृक्षांची निगा राखणं व जोपासना करणे हीच वडीलांना खरी आदरांजली राहील अशी भावना सहा भावांनी व्यक्त केली आहे. परिसरातून या उपक्रमाबद्दल जगताप कुटुंबाचे कौतुक केले जात आहे.