Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॅशिंग आयपीएस अधिकारी अंकित गोयल यांनी पुणे जिल्ह्याचे (ग्रामीण) मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 October 2022, 17:48

पुणे : डॅशिंग आयपीएस अधिकारी अंकित गोयल यांनी पुणे जिल्ह्याचे (ग्रामीण) मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून आज रविवारी (ता.३०) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पदभार स्वीकारला आहे.

अंकित गोयल यांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेऊन भारतीय पोलीस सेवेत १३ फेब्रुवारी २०१२ रोजी रुजू झाले. तरुण पोलीस अधिकारी अंकित गोयल यांच्याकडे अवघ्या आठ वर्षांच्या सेवेनंतर गडचिरोलीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याची धुरा आली. अंकित गोयल यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून २८ सप्टेंबर २०२० रोजी पदभार घेतला. वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष उपक्रम सुरू केला.

या काळात अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या चकमकींमध्ये २७ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडेसह ५४ नक्षलवादी मारले गेले. दोन वर्षात ४४ जणांना अटक करण्यात यश आले. १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळेच गडचिरोलीत सेवा देणाऱ्या ४२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पदक, ३ जणांना शौर्यचक्र तर २ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर करण्यात आले. एवढ्या संख्येने एका जिल्ह्यात एकावेळी शौर्य पदक जाहीर होणारा गडचिरोली हा पहिलाच जिल्हा ठरला. या कामगिरीत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे.

 

अंकित गोयल यांनी सामाजोपयोगी विविध उपक्रम राबविले. यामध्ये आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन, १६ आत्मसमर्पितांचा सामूहिक विवाह, दुर्गम भागातील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘पोलीस दादालोरा खिडकी”, अर्थात ‘पोलीस दादाची खिडकी’ उपक्रम, २१ हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ, दोन हजार युवांना विविध क्षेत्रात रोजगार, असे अनेक उपक्रम त्यांनी केले.

दरम्यान, आगामी काही महिन्यात पुणे महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी अंकित गोयल यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

मालवंडीला जोडणाऱ्या चारही रस्त्यांची चाळण, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता : नागरिकांना करावी लागतेय तारेवरची कसरत, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.