शिरूर, (पुणे) : विशेष मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तब्बल ९ वर्षानंतर १० वर्षाची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी रागीट यांनी दिले आहेत. प्रतापनाना उर्फ प्रताप बबनराव भोसुरे (वय-५९ रा धानोरे ता. शिरुर जि. पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशेष पिडीत मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सदर प्रकार हा मे २०१५ रोजी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विशेष पिडीत मुलगी घरी एकटी असताना, आरोपीने पिडीतेला गोळ्या खायला देतो, असे सांगून एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यावर बळजबरीने शाररीक संबंध ठेवले. दरम्यान, पीडिता तीन महीण्याची गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पिडीतेच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार प्रताप भोसुरे याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील लीना पाठक यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला १० वर्षाची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश डी पी रागीट यांनी दिले आहे.
दरम्यान, या खटल्यात सरकली वकील लीना पाठक यांना शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, आकाश पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत व पोलीस हवालदार एस.बी भागवत यांनी मदत केली.