पुणे : राज्याचे माजी सहकार आयुक्त आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी अनिल कवडे (Anil Kawade) यांची राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार (Anup Kumar) यांनी गुरुवारी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.
हा शपथविधी राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयात झाला आहे. या शपथविधीनंतर अनिल कवडे यांनी कार्यभार स्वीकारला.
यावेळी प्राधिकरणाचे माजी आयुक्त जगदीश पाटील, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे, अतिरिक्त सहकार आयुक्त शैलेश कोथमिरे, सहकार व पणन विभागाचे सहसचिव संतोष पाटील उपस्थित होते.