थेऊर, (पुणे) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर (Theur) (ता. हवेली) येथे काही अल्पवयीन मुले – मुली हुक्का ओढताना आढळून आल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social media) व्हायरल होत आहे. पालक मोठी स्वप्न बघून महागडे शिक्षण देण्यासाठी धडपडत असताना काही विद्यार्थी मात्र हर स्वप्न को धूए मे उडवताना दिसत आहेत.
थेऊर परिसरात सुरु असलेल्या या अवैध व्यवसायाला कोण पाठबळ देतोय ? असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जाऊ लागला आहे. जुगार, मटका, हुक्का पार्लर अशा अवैध धंद्यांना बंदी असताना हे व्यवसाय राजरोसपणे कोणता परवाना घेऊन सुरू आहेत हाही प्रश्न आहे.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाला स्थानिक पोलीस स्टेशन व अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत तर पोलीस आयुक्त यावर काही कारवाई करणार का असा देखील प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.