नवी दिल्ली: काँग्रेसने गोवा, मध्य प्रदेश आणि दादरा येथील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 6 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये मध्य प्रदेशसाठी तीन, गोव्यासाठी दोन आणि दादरासाठी एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसने मध्य प्रदेशातील मुरैनामधून सत्यपाल सिंग सिकरवार (नीतू), ग्वाल्हेरमधून प्रवीण पाठक आणि खांडवामधून नरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर गोव्यातून रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर अजित रामजीभाई महाला हे दादरा आणि नगर हवेली (एसटी) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.