अजित जगताप
वडूज : दिवाळीचा सण साजरा करावा की, आरोग्यासाठी दवाखान्यात उपचार करावेत असा प्रश्न सध्या वडुजकरांना पडला आहे. त्यामुळे वडूज नगरीच्या साथी रोगाबाबत मनसे आक्रमक झाली आहे. मनसे युवा नेते सूरज लोहार व मनसे कार्यकर्त्यानी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील बहुतांशी गावात सध्या विविध साथीच्या आजाराने सर्वजण त्रस्त आहेत. या आजारांवर ठोस उपाययोजना, जनजागृती व लोकांच्या आरोग्य तपासण्या करण्याबाबत नगरपंचायत व खटाव पंचायत समिती प्रशासनाने ठोस उपाययोजन करावी अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
परंतु, त्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू केली नाही. हे खेदाने मनसे ने नमूद केले आहे. खटाव तालुक्यातील गावांमध्ये तसेच वडूज नगरपंचायत तसेच इतर ठिकाणी चिकन गुनिया, डेंगू गॅस्टो, मलेरिया इ. या साथीच्या आजाराने सरकारी व खाजगी दवाखान्यात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी येथील प्रशासनाच्या नाकर्तेपणा चे दर्शन घडवित आहेत.
आता पर्यत औषध पाण्यासाठी गोरगरिबांना कर्ज काढून उपचार करण्याची पाळी आली आहे. त्यांची काळजी घेण्याऐवजी काही महाभाग हे स्वतः तयार न केलेल्या शुभेच्छा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून माणूस घाणी प्रकार करीत आहेत. त्याचा ही यानिमित्त निषेध व्यक्त होत आहे. अगोदर लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सहकार्य करा. ते जमत नसेल तर निदान गप्प बसा उगीचच शुभेच्छा देण्याच्या पोकळ कामगिरीतून स्वतःचे अपशकुनी थोबाड दाखविण्याचा प्रयत्न करू नका असे ही नमूद करण्यात आले असून त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.
आरोग्यासाठी ठोस उपाययोजना करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा मनसे या विरोधात आंदोल छेडेल असा इशारा मनसे जिल्हा रोजगार विभागअध्यक्ष सुरज लोहार दिलेल्या आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांना लोकशाही मार्गानेच जाब विचारला जाईल असे ही स्पष्ट केले आहे.
यावेळी मंगेश पवार, सागर माने, विशाल लोहार अमित कावरे, ऋषिकेश लोहार, विशाल गोडसे, अमित पंडीत,अजित बुरुंगले,आदित्य लोहार, मनोज माने, हणमंत पवार, मन्सूर खोत, पवन नागावकर,रमेश खाडे, अशोक गोडसे आदी मनसेचे मनसैनिक व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.