मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच राज ठाकरे सांगतील त्या जागेवर आपण लढण्यास तयार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. उमेदवारी कुणाला द्यायची हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.