पुणे: रविवारी 10 मार्च रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नियामक मंडळाची बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक नेतेही उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.