पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. बहिणीला पळवून नेऊन तिला लपवून ठेवल्याचा गैरसमज मनात ठेऊन चारजणांनी सोसायटीच्या पार्कींगमध्ये पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन नुकसान केयाची घटना घडली आहे. हा प्रकार कोंढवा बुद्रुक येथील साईनगर येथे २७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी ४ जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्रकाश बालाप्पा पुजारी (वय-५० रा. कमान पॅराडाईज सोसायटी, साईनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात २९ फेब्रुवारीला फिर्याद दिली आहे. यावरुन मनोज चौधरी आणि त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज त्याच्या इतर मित्रांना घेऊन फिर्यादी यांच्या घरी आला. फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीच्या बहिणीला पळवून नेऊन तिला लपवून ठेवल्याचा गैरसमज मनात ठेवून रागाच्या भरात फिर्यादी यांच्या कानशिलात लगावली. तसेच ढकलून देऊन दरवाजा लावुन घेत आरोपींनी तेथून जाताना त्यांच्या हातातील धारदार शस्त्राने सोसायटीच्या पार्किंग मधील वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड करीत आहेत.