ठाणे : भिवंडी लोकसभा ही पारंपरिक काँग्रेसची जागा आहे. भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरद पवार यांना मिळणार अशा येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांना ही माहिती दिली आहे. त्यांनी ही माहिती महाराष्ट्राचे प्रभारी चेनीथला यांना द्यायला सांगितली आहे. खासदार खरगे यांनी आश्वासन दिलं आहे की, भिवंडी लोकसभा ही काँग्रेसच लढेल, अशी माहिती काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली.