सांगली : केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये केलेली वाढ ही तोकडी आहे. शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक तसेच वाढलेले रासायनिक खतांचे दर पाहता यामध्ये अजूनही वाढ होणे गरजेचे आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रति टन २५ रूपयांची वाढ केली आहे.
पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला . ऊस खरेदी दरात सुमारे 8% वाढ करण्यात आली आहे. सध्या उसाची खरेदी किंमत 315 रुपये प्रति क्विंटल आहे, ती आता 340 रुपये होईल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत ते म्हणाले, “मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत असून याअंतर्गत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उसाचा खरेदी दर निश्चित करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला आहे. उसाची खरेदी किंमत म्हणजे एफआरपी ₹ 340 प्रति क्विंटल करण्यात आली आहे, जी पूर्वी ₹ 315 प्रति क्विंटल होती.