मुंबई : पक्षाची घटना, रचना आणि विधिमंडळातील संख्याबळ या त्रिसुत्रीच्या आधारावर अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरतो, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद पक्षातील फूट नाही. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले होते. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाविरोधात अजित पवार गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न केल्याप्रकरणी अजित पवार गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली