पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या लॅपटॉपचा वापर अनेकजण करतात. लॉकडाऊननंतर ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु झाल्यानंतर लॅपटॉपच्या वापरात झालेली वाढ अद्यापही कायम आहे. पण लॅपटॉपवर काम करताना अनेकजण मांडीवर ठेऊन तासन् तास बसतात. मात्र, हे करणं तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. लॅपटॉपमधून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. अशाप्रकाराने टोस्टेड स्किन सिंड्रोम या आजाराची भीती वाढू शकते.
एकाच जागी बसावं लागू नये म्हणून सध्या लॅपटॉपला डेस्कटॉपच्या तुलनेत मोठी मागणी आहे. याच लॅपटॉपवर काम करताना अनेकजण मांडीवर लॅपटॉप ठेऊन काम करतात. असे केल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम केल्याने चुकीच्या आसन व्यवस्थेमुळे पाठीचे दुखणे वाढू शकते. लॅपटॉपमधून गरम हवा बाहेर पडते. त्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. टोस्टेड स्किन सिंड्रोम या आजाराची भीती वाढू शकते. त्यामुळे मांडीवर लॅपटॉप ठेऊन काम करताना काळजी घ्यावी लागते.
लॅपटॉपवर काम करताना आरोग्य जपायचे असेलच तर एक आरामदायक खुर्ची आणि योग्य टेबल घ्या. लॅपटॉप टेबलवर ठेऊन तुम्ही काम करु शकता. डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही 20-30 मिनिटांनी एक ब्रेक घेणे गरजेचा आहे. लॅपटॉपवर काम करताना प्रकाश भरपूर असावा. तुम्ही योग्यरितीने बसला असल्याची खात्री करा. याशिवाय, थोड्या प्रमाणात का होईना पाठीदुखी होणार नाही, याची काळजी घ्या.