मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीला दिला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष आहे. दुसरीकडे, शरद पवार यांना काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. आता निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाणार का? याचीही चर्चा रंगली आहे.