Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘महाराष्ट्रात मोदींची एकही सभा होऊ देणार नाही’, मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला मोठा इशारा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 13 February 2024, 22:36
sage soyare GR very soon says chandrakant patil

जालना: “महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा होऊ देणार नाही”, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. “फक्त नाटकं सुरु आहे. तुम्हाला आम्ही मराठे सोपे वाटतात का?” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे यांचं चौथ्या दिवशीसुद्धा उपोषण सुरु आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे. परंतु, ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत.

जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आज मंगळवारी विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आले होते. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचे आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु, जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. याउलट त्यांनी राज्य सरकारला पंतप्रधान मोदींची एकही सभा होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. “काय नुसतं चाललं आहे, मजा चालली आहे. तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय? बेसावध राहू नका. महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधानांच्या सभा होऊ देणार नाहीत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांचा घोटाळा तुम्ही मागे घेतला. पाच महिने झाले प्रक्रिया सुरू असून तुम्हाला राज्य शांत बघायचे नाही. पाच महिन्यांपासून केवळ प्रक्रिया सुरू आहे. आम्हाला पण पोलिसांच्या विरोधात बीड आणि राज्यभर केस करायच्या आहेत. आमचेसुद्धा डोके फोडले आहेत. आम्हाला दोन हजार पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे आहेत”, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“शिंदे, फडवणीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत? सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असाल तरच आमच्याकडे या. तुम्ही 15, 16 तारखेनंतर मजा बघा. दोन दिवसांत अधिवेशन घेणार होते. ते घेतलं का? डबल रोल करू नका. मराठे काय आहेत ते तुम्ही 15, 16 तारखेनंतर बघा”, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08

पाथर्डीचा सुपुत्र हैदराबादचा पोलीसप्रमुख! आयपीएस महेश भागवत यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा; विश्वास नांगरे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Sunday, 15 November 2026, 18:55
Next Post
NCP disqualification judgment on 15 february

राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी 15 फेब्रुवारीला निकाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp