पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शारीरिक संबंधासाठी तरुणी देतो असं सांगून एका तरुणाला मोकळ्या जागेत नेऊन लुटल्याचा प्रकार घडला आहे. तिन जणांनी तरुणाकडून फोन पेवर ४३ हजार रुपये घेतले. हा प्रकार २४ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी परिसारत असलेल्या मोकळ्या जागेत घडला आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विशाल राजेंद्र नलावडे (वय-२२ रा. मरकळ रोड, आळंदी, पुणे) याने शनिवारी १० फेब्रुवारीला विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आदिल आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तीन आरोपींनी फिर्यादी नलावडे यांना शरीर संबंधासाठी मुलगी देतो असं सांगून विश्रांतवाडी परिसरातल्या एका खदाणी जवळच्या मोकळ्या जागेत घेऊन गेले. आरोपी आणि त्याच्या मित्रांनी त्याला मारहाण करुन शिवीगाळ तसेच दमदाटी केली. यानंतर फिर्यादी यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. यानंतर फिर्यादी यांच्याकडून फोन पे नंबऱ घेतला. त्यानंतर फोन पे द्वारे जबरदस्तीने ४३ हजार रुपये काढून घेऊन मोबाईल घेऊन पळ काढला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत.