पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचं महत्व नेमकं काय असते? तसेच हा हक्क बजावल्याने समाजात काय परिणाम होऊ शकतो? मतदारांची भूमिका नेमकी कोणती असावी? याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही टिकवण्यासाठी मतदान कसं महत्वाचे आहे, तरुण मतदारांना जागृत करण्याचा हा दिवस आहे. मतदानाची शक्ती आणि उपयोगिता आजच्या तरुण पिढीला कळाली तरच ते निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभागी होतील, असे प्राचार्य डॉ. सचिन कोतवाल यांनी सांगितले.
यावेळी विभाग प्रमुख प्रा. मनोज जोगराणा, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. अश्विनी बनकर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. प्रियंका बोरुडे, ग्रंथपाल कांचन बुचडे, प्रा. ऐश्वर्या निचळ, प्रा. अश्विनी सांडगे, प्रा. स्नेहा वासनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. ज्योती दारकुंडे यांनी केले.