Republic Day 2024 Hoisting Flag : येत्या शुक्रवारी म्हणजेच २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. प्रजाकसत्ताक दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात प्रजाकसत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दरम्यान, या प्रजाकसत्ताक दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतात. मात्र, राज्यातील महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अद्यापही अपूर्णच आहे.
त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहन करणार याबाबत संभ्रम आहे. यावर सरकारने तोडगा काढला असून कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहन करणार याची यादी जाहीर केली आहे.
कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यात करणार ध्वजारोहण ?
- देवेंद्र गंगाधरराव फडणवीस – नागपूर
- अजित अनंतराव पवार – पुणे
- राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील – अहमदनगर
- सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार – चंद्रपूर
- दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील – बुलढाणा
- विजयकुमार कृष्णराव गावित – भंडारा
- हसन मियालाल मुश्रीफ़ – कोल्हापूर
- अब्दुल सत्तार अब्दुल नबी – हिंगोली
- चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील – सोलापूर
- गिरीश दत्तात्रय महाजन – धुळे
- सुरेश (भाऊ) दगडू खाडे – सांगली
- तानाजी जयवंत सावंत – धाराशिव
- उदय रविंद्र सामंत – रत्नागिरी
- दादाजी दगडू भुसे – नाशिक
- संजय दुलीचंद राठोड – यवतमाळ
- गुलाबराव रघुनाथ पाटील – जळगाव
- संदिपानराव आसाराम भुमरे – छत्रपती संभाजीनगर
- धनंजय पंडितराव मुंडे – बीड
- रविंद्र दत्तात्रय चव्हाण – सिंधुदुर्ग
- अतुल मोरेश्वर सावे – जालना
- शंभूराज शिवाजीराव देसाई – सातारा
- मंगल प्रभात लोढा – मुंबई उपनगर
- धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – गोंदिया
- संजय बाबुराव बनसोडे – लातूर
- अनिल भाईदास पाटील – नंदूरबार
- दीपक वसंतराव केसरकर – ठाणे
- आदिती सुनील तटकरे – रायगड
राज्य सरकारनं पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ज्या जिल्ह्यांची नावे नाहीत, त्या जिल्ह्यात विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी ध्वजारोहन करणार आहेत.