अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम झाला आहे. यासाठी नेता- अभिनेता या सगळ्यांनी तिथे हजेरी लावली. यात अक्षय कुमार, कंगणा रणौत, टाइगर श्रॉफ, हरिहरण, रजनीकांत, अमिताभ बच्चन या कलाकारांचा समावेश आहे. आता चर्चा आहे सेलिब्रिटींनी दान केलेल्या रक्कमेची. चला जाणून घेऊया त्यांनी किती पैसे दान केलं.
किती मिळालं दाण?
पीटीआय या न्यूज एजंसीला श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितले की आतापर्यंत 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. मात्र, अजुनही 300 कोटी रुपयांची गरज पडू शकते. अनेकांनी मंदिरासाठी दान केले आहे. दान करणाऱ्या कलाकारांमध्ये अक्षय कुमार, अनुपम खेर आणि गुरमीत चौधरीसोबत अनेक कलाकारांनी मंदिर निर्माणमध्ये मदत केली आहे.
अनुपम खेर यांनी गेल्यावर्षी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ते अयोध्या गेल्याचे दिसत होते आणि त्यांनी मंदिराच्या निर्माणची झलक दाखवली होती. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी काही रक्कम दान केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त प्रणिता सुभाषनं 1 लाख रुपये दान केले होते.
‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी देखील श्रीराम मंदिरासाठी दानं केले. 1.1 लाख रुपयांचा चेक मंदिर निर्माणसाठी देण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली होती. याशिवाय दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता पवन कल्याणने 30 लाख रुपयांचे दान केले. दरम्यान, हेमा मालिनी, गुरमीत चौधरी, मनोज जोशीनं देखील दान केले असून त्यांनी किती रक्कम दान केली याचा खुलासा केला नाही.
2021 मध्ये अक्षय कुमारने व्हिडीओ शेअर करत राम मंदिराच्या निर्माणसाठी दान करत छोटी सुरुवात केली याचा खुलासा केला होता. त्याने लोकांना देखील योगदान कशा प्रकार ते करु शकतात हे सांगितले. अक्षय कुमारने लिहिले की ‘खूप आनंदाची गोष्ट आहे की अयोध्येत आपल्या श्री रामच्या भव्य मंदिराची निर्मिती सुरु झाली आहे. आता योगदान देण्याची आपली वेळ आहे. मी सुरुवात केली आहे, अपेक्षा आहे की तुम्ही देखील आमच्यासोबत एकत्र याल.’