पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही सांगण्यात येत आहे. महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते.
त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार असून तशा प्रकारच्या सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत.
सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. या आधी नक्षलवाद्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धमकी आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, आमच्या दलमच्या अनेक साथीदारांना तुम्ही आल्यापासून शहीद व्हावं लागलं. त्याचा बदला आम्ही लवकरच घेऊ,” असे धमकीवजा पत्र सीपीआय (माओवादी) या नावाने ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहचल्याची माहिती देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीत काम सुरू केल्यापासून आमचा पैसा बंद झाला असेही या पत्रात नमूद होते व याचे चोख उत्तर दिले जाईल असे म्हणत शिंदें व त्यांच्या परिवाराला याची पूर्ण किंमत चुकवावी लागेल,” अशी धमकी पत्रात देण्यात आली होती.