लहू चव्हाण
पाचगणी : वन्यजीव संवर्धनासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने वन विभागाच्या वतीने महाबळेश्वर वनक्षेत्रपाल आर.एस.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाबळेश्वर येथील शेठ गंगाधर माखरिया हायस्कूल येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीव व वनाविषयी माहिती देण्यात आली जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. वनपाल स. वि. भिसे यांनी दिवसेंदिवस जंगल कमी होत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आल्याने वन्यजीवांच्या संरक्षणाकरिता हातभार लावण्यासाठी वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येत माहिती सांगितली.
यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण, वनरक्षक तानाजी केळगने, ल. ज्ञा.राऊत, र. ना. गडदे, अ. भा. सावंत, वनमजुर सं. बा. कदम
व शिक्षक आदी उपस्थित होते.