मुंबई : देशात वाढत्या केरोनाच्या कोव्हिड जे.एन 1 रूग्णसंख्येवर आणि केरोना रूग्णांच्या मृत्यूवर नियंत्रण आणण्यासाठी टास्क फोर्सकडून सल्ला देण्यात आला आहे. सहव्याधी असलेल्या कोरोना रुग्णांना रेमेडिसिविर देण्याचा टास्क फोर्सचा सल्ला कोविड टास्कफोर्सने सुक्रवारी (दि.12) दिला आहे. कोरोना बरोबरच शुगर , बीपी अशा सहव्याधी असलेल्या लोकांना रेमेडिसिविर इंजेक्शन उपयुक्त असल्याचे टास्कफोर्सने स्पष्ट केले आहे.
डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी टास्कफोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोना बाधितांना कोणती औषधे आणि इंजेक्शन देण्यात यावी? याबाबत मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यात तीन औषधांचा समावेश करण्यात आला आहे.
सहव्याधी असणाऱ्या रुग्णांना कोणते उपचार?
1. तीन दिवसांकरिता रेमेडिसिविर इंजेक्शन देण्यात यावे. किंवा,
2. निर्मत्रेलवीर/रिटोनावीर हे 5 दिवसांकरिता किंवा
3. मोल्नुपिरावील हे औषध कोरोना बाधितांशी समउपदेशन करुन वापरावे, असा सल्ला कोविड टास्क फोर्सने दिला आहे.
सरसकट अँटीबायोटिक्स वापरू नये
सर्व रुग्णांना सरसकट ॲंटिबायोटिक्स वापरू नये असा सल्लाही टास्कफोर्सची बैठकीत देण्यात आला. मात्र, आवश्यकता असल्यास ॲंटिबायोटिक्सचा वापर करावा, असे टास्क फोर्सने स्पष्ट केले. शिवाय, कोरोनाची साथ सुरुवातीला वाढली तेव्हा कोरोनामुळे मृत्यू झालेला लोकांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत नव्हता. यावर टास्कफोर्सने स्पष्टपणे भाष्य करत कोव्हिड रुग्णांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना देण्याचे आवाहन टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी केले आहे.