पुणे : हडपसर परिसरातून वाहन चोरीमधील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखा, युनिट ६ कडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १ लाख १५ हजार किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. स्वप्नील व्हणमाने (वय २३ रा. शिवतेजनगर काळेपडळ, हडपसर, पुणे) त्याचे नाव आहे.
दि.१० जानेवारीला रोजी गुन्हे शाखा युनिट-६ मधील पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे व नितीन मुंढे यांना पेट्रोलिंग करत असताना स्वप्नील व्हणमाने सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळ काळेपडळ, हडपसर येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
त्यानंतर तात्काळ युनिट-६ मधील अंमलदार बाळासाहेब सकटे व नितीन मुंढे यांनी त्याचा तपास करायला सुरूवात केली, आणि स्वप्नील व्हणमाने याला ताब्यात घेतले. त्याला वाहनाच्या कागदपत्रांची विचारपूस केली असता, त्याच्याकडे कागदपत्र नसल्याचे आढळले. त्यानंतर त्याला सी.आर.पी.सी ४१ (१) (ङ) प्रमाणे अटक केली आहे. तपासात पलिसांना स्वप्नील व्हणमानेवर ४ गुन्हे असल्याचे निष्पण्ण झाले. त्याशिवाय, त्याच्याकडून एकुण १ लाख १५ हजार किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे, पोलीस आयुक्त, गुन्हे-२, पुणे, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक, उल्हास कदम, पोलीस अंमलदार, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.