Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही खोतीदारांना मांजरी उपबाजारात मज्जाव; संचालक मंडळाच्या हुकूमशाहीविरोधात 26 जानेवारीपासून आमरण उपोषण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 11 January 2024, 20:03

पुणे : मांजरी उपबाजारात खोतीदारांना संचालक मंडळाने दोन महिन्यांपासून मज्जाव केल्याने 15 जानेवारीपासून शेतकऱ्यांचा माल काढण्याचे बंद करण्याचा ठराव खोतीदारांनी केला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही संचालक मंडळांने खोतीदारांना प्रवेश नाकारल्याने 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा बाळासाहेब भिसे यांनी दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व हडपसर पोलीस स्टेशनला निवेदनही दिले आहे.

नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. नव्या संचालक मंडळाने तातडीने मांजरी उपबाजारातील खोतीदारांना शेतकऱ्यांचा बाजार आहे, कारण सांगून मज्जाव केला, त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले खोतीदार चालक व कामगार यांच्या रोजीरोटीवर कुऱ्हाड कोसळली. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटून खोतीदारांनी निवेदन दिले. पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी संचालक मंडळासोबत बैठक घेतली. तेव्हा सभापती व संचालकांनी खोतीदारांना सध्या मांजरी उपबाजारात व्यवसाय करण्यास परवानगी देऊ व त्यानंतर कोरेगाव येथे खोतीदारांसाठी वेगळे मार्केट तयार करू, असे आश्वासन दिले होते.

संचालक मंडळाचा विरोध असल्याचे कारण सांगून सभापतींनी खोतीदारांना मांजरी उपबाजारात प्रवेश देणार नसल्याचे सांगितल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेले खोतीदार व संबंधित सर्व हतबल झाले आहेत. उपमुख्यमंत्र्यांना संचालक मंडळ जुमानत नसल्याने सर्व खोतीदारांनी बैठक घेऊन हवेली व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल सोमवार 15 जानेवारीपासून काढणार नसल्याचा ठराव मंजूर केला.

 

तसेच खोतीदारांना पुन्हा उपबाजारात विक्री करण्याची परवानगी द्यावी व संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी हडपसर येथे बाळासाहेब भिसे आमरण उपोषण करणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व हडपसर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे, अशी माहिती भिसे यांनी दिली. ठरावास अनुमोदन अशोक मुळीक, विलास उर्फ पप्पू मोडक, रोहित सुर्यवंशी, गणेश कामठे, साहेबराव झांबरे यांनी दिले आहे.

खोतीदारांचे कुटुंब व कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर

पूर्वापार चालत आलेल्या गावगाड्यातून खोतीदार हा व्यवसाय गावोगावी चालत आहे. हवेली व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मला 40 ते 50 खोतीदार काढतात. सुमारे एक लाख पालेभाजी जुडी रोज काढली जाते, शेवाळवाडी उपबाजारात सुमारे 60 हजार जुडी विक्री होते. या व्यवसायावर खोतीदार चालक व कामगार महिला मिळून सुमारे 600 लोकांना रोजगार मिळतो. संचालक मंडळाने मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव केल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दरम्यान, या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्याशी संपर्क साधला असता संचालकांनी विरोध केला असल्याने आम्ही खोतीदारांना मांजरी उपबाजारात प्रवेश देणार नाही. त्यांच्यासाठी कोरेगाव येथे नवीन मार्केट लवकरच तयार करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

कष्टकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहणार

नव्या संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने केवळ त्यांचा अहंकार जपण्यासाठी मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव केला. एकूण 35 वर्षांपासून आणि अकरा वर्षांपासून आम्ही या बाजारात व्यवसाय करत होतो. कोणताही गैरकारभार केला नाही, संचालकांनी चालविलेला मनमानी व गैरकारभार याची उच्चस्तरीय चौकशी राज्य सरकारकडून व्हावी. या मागणीसाठी 26 जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. परंतु मागे हटणार नाही.

– बाळासाहेब भिसे, खोतीदार-आंदोलक 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post

'एवढा माज...जनताच तुम्हाला फाशी देईल'; बांगर यांच्या चॅलेंजवर शिवाजीराव चोथेंचे प्रत्युत्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.