लोणी काळभोर : हवेली तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि मुख्याध्यापक संघाच्यावतीने हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांना गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
थेऊर येथील चिंतामणी विद्यामंदीरात नुकताच गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, उपाध्यक्ष सुरेश कांचन यांच्या हस्ते निशा झिंजुरके यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी नंदकुमार सागर, सचिन गायकवाड, आदिनाथ थोरात, संचालक शशिकांत गायकवाड, उपसरपंच अप्पासाहेब काळे, रविंद्र पानसरे, सचिव हनुमंत पवार, उपाध्यक्ष आबा जाधव, कन्या प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
दरम्यान, निशा झिंजुरके यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस एम गवळी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांनी सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना निशा झिंजुरके म्हणाला की, हवेली तालुका मुख्याध्यापक संघाने दिलेल्या पुरस्कार हा मी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना समर्पित करते. बापूजींच्याश्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गेल्या 34 वर्षापासून मी ज्ञान दानाचे काम करीत आहे. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान मानते. तसेच हा पुरस्कार केवळ माझ्या एकटीचा नसून शाळेतील सर्व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आहे.