Maharashtra Weather : मुंबई : भारतीय हवामान विभागाने जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनग या ६ जिल्ह्यात पाऊसाची शक्यता व्यक्त केली आहे. आज (५ जानेवारी २०२३) आणि उद्या (६ जानेवारी २०२३) मेगगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गुरुवारी अवकाळी पावसाने सांगली आणि बुलढाणा जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, तुर, मका, हरभरा, गुरांचा चाऱ्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
धुळे, नंदुरबार येथेही रविवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याचबरोबर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील ७२ तासांत हलक्या पाऊस पडू शकतो. याशिवाय, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय.
गुरुवारी नोंदवलेले तापमान
गोंदिया – १३.५ अंश सेल्सिअस
धुळ्यात – १३.६ अंश सेल्सिअस
पुणे – १५.९ अंश सेल्सिअस
जळगाव – १६.९ अंश सेल्सिअस
कोल्हापूर – १९.७अंश सेल्सिअस
महाबळेश्वर – १५.५अंश सेल्सिअस
नाशिक – १५.९ अंश सेल्सिअस
निफाड – १३.५अंश सेल्सिअस
सांगली – १९.९अंश सेल्सिअस
सातारा – १६.५अंश सेल्सिअस
सोलापूर – १९अंश सेल्सिअस
मुंबई – १९अंश सेल्सिअस
डहाणू – १८.५अंश सेल्सिअस
रत्नागिरी – २१.२अंश सेल्सिअस
छ. संभाजीनगर – १६.४ अंश सेल्सिअस
नांदेड – १७.८अंश सेल्सिअस
परभणी – १६.४अंश सेल्सिअस
अकोला – १७.५अंश सेल्सिअस
अमरावती – १७.१अंश सेल्सिअस
बुलडाणा – १७.५ अंश सेल्सिअस
ब्रह्मपुरी – १५.४ अंश सेल्सिअस
चंद्रपूर – १५.२अंश सेल्सिअस
गडचिरोली – १४.८ अंश सेल्सिअस
नागपूर – १६ अंश सेल्सिअस
वर्ध्यात – १६ अंश सेल्सिअस