नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे सुविचार मंच आयोजित चौथा सुविचार गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ होते. यावेळी पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीत डावललं गेल्याचा पाढा वाचला.
मी काही लेचापेचा नाही. जी वस्तू स्थिती आहे ते मी बोलणार आहे. तुमच्या तोंडावर एक बोलायचे आणि पाठीमागे दुसरे बोलायचे अशी व्यक्ती मी नाही. असे उद्गार त्यांनी केले. त्याशिवाय, माझी गेल्या तीस वर्षांची कारकीर्द पाहिली तर तुम्हालाही वाटेल की आम्हाला कुठेतरी संधी दिली पाहिजे. ८० वर्षाच्या लोकांनी आता आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्याचे काम करावे, असे वक्तव्य गुरुवारी अजित पवारांनी नाशकात केले.
पुरस्कार सोहळ्यास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. दिलीप बनकर,आ. दिलिप बोरसे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, विष्णुपंत म्हैसधुणे, लक्ष्मण सावजी, राजेंद्र डोखळे,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,डॉ. स्वप्नील तोरणे, प्रा. विनोद गोरवाडकर,प्रा. डॉ. प्रशांत सूर्यवंशी, सुविचार मंचचे ऍड. रवींद्र पगार आणि आकाश पगार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यांचा झाला गौरव
जीवन गौरव – पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर
कला – अभिनेते गौरव चोपडा
विशेष पुरस्कार – अभिनेत्री अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी
सामाजिक – रामचंद्रबापू पाटील
वैद्यकीय – डॉ. भाऊसाहेब मोरे
शैक्षणिक – डॉ. शेफाली भुजबळ
साहित्य – दत्ता पाटील
उद्योग – चंद्रशेखर सिंग
कृषी – संगीता बोरस्ते
सहकार – प्रा. नानासाहेब दाते
क्रीडा – गौरी घाटोळ