नवी दिल्ली : सध्या महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. त्यात नवीन वर्ष आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आले आहेत. तुम्ही पण नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, 1 जानेवारीपासून मारुती सुझुकी, होंडा, एमजी आणि टाटा या कंपन्यांच्या कार महाग झाल्या आहेत.
बहुतांश कार कंपन्यांनी नवीन वर्षापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडी इंडियाने आपल्या वाहनांच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. तसेच मारुती, होंडा, एमजी, टाटा या कंपन्यांनीही वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत.
कंपन्यांनी अद्याप त्यांच्या साईटवर नवीन किंमती अद्ययावत करण्यात आल्या नाहीत. टाटा मोटर्सने त्यांच्या सर्व व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत सुमारे 3% वाढ केली आहे.