Health Tips: पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या निरोगी आरोग्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. पेयांमध्ये लिंबू पाण्याला विशेष महत्व असते. तसेच नीरा देखील फायदेशीर मानले जाते. नीरामध्ये लोहाचे प्रमाण रक्ताची गुणवत्ता राखण्यासाठी आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाचा असतो. नीरा हा श्वसनाच्या आजारातही गुणकारी मानला जातो. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते.
नीरा मिश्रण उच्च तापमानाला गरम करून त्याचे रूपांतर घट्ट सिरप किंवा पाकामध्ये होते. क्लोरीनचे प्रमाण शरीरातील द्रव पदार्थांचे प्रमाण आणि पीएच संतुलित राखण्यास मदत होते. झिंक शरीरातील मज्जातंतूंची वाढ, बुद्धिमत्ता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. नीरा हे चवीला गोड व कमी उष्मांक असलेले पेय आहे. कमी ग्लासमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेहासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांवर सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
नीराच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी देखील मदत होते. झिंक शरीरातील मज्जातंतूंची वाढ, बुद्धिमत्ता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर मानले जाते. नीरामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वांच्या मुबलक प्रमाणामुळे चयापचय आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. सोडिअमचे प्रमाण शरीरातील आरोग्यदायी क्षारांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठीही उपयुक्त ठरते.