Mumbai News : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास धमकीचा फोन आला आहे. हा धमकीचा फोन आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. कॉलरने मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला आहे. यानंतर एक वाक्य बोलून कॉलरने लगेचच कॉल डिस्कनेक्ट केला. यासंदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे.
शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हा फोन आला होता. पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली असून अनेक ठिकाणी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात फोन जे. बी नगर एअरपोर्ट रेसिडन्सी कॉम्पलेक्समधून फोनचे लोकशन दाखवत असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला शनिवारी सहाच्या सुमारास एक फोन आला. मुंबईत आम्ही बॉम्बस्फोट घडवणार आहोत, असं समोरच्या व्यक्तीने सांगितलं आणि लगेच फोन कात केला. समोरून बोलणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? याविषयी कोणतीही माहिती त्या कॉलमध्ये देण्यात आली नाही. बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिल्यानंतर फोन करणाऱ्याकडून अधिक माहिती काढून घेण्याचा प्रयत्न कंट्रोल रूममधील कर्मचाऱ्यानं केला. मात्र, धमकी दिल्यानंतर लागलीच समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. या फोनने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Mumbai Police Control received a threatening phone call last evening at around 6 pm where the caller claimed that there would be blasts in Mumbai and disconnected the call after saying this. Police have started investigations at several places but till now nothing suspicious has…
— ANI (@ANI) December 31, 2023