Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हा परिषदेच्या ४ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या; स्वजिल्ह्यात नियुक्ती मिळाल्याने गुरुजी खूश!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 11:41

पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांची सातत्याने चर्चा होत असते. सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी शिक्षकांचा आटापिटा सुरू असतो. मात्र, आता ऑनलाईन प्रणालीमुळे बदल्यांसाठी शिफारस कामात येत नाही. यंदा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधून सुमारे १५ हजार शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केले होते. त्यानंतर राज्याच्या ग्रामविकास विभागाने शनिवारी (ता. ३०) राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ४ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या आहेत. या सर्वांना स्वजिल्ह्यात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून परजिल्ह्यात नोकरी करणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बदलीचे हे आदेश ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, बदली आदेश मिळालेला असला तरी या शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या शाळांवरच काम करावे लागणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या शाळांवरच शिक्षकांना हे शैक्षणिक वर्ष काम करावे लागणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात नवीन ठिकाणी शिक्षकांना रुजू होता येणार आहे. राज्यातील १५ हजार शिक्षकांनी बदल्यांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ४ हजार जणांच्या बदल्या झाल्या आहेत. यामुळे आता ११ हजार शिक्षकांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

या बदल्यांसाठी प्रहार शिक्षक संघटनेतर्फे सातत्याने प्रयत्न केले जात होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर आज यश आले आहे. या टप्प्यात ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत, अशा सर्व पात्र शिक्षकांची संभाव्य बदल्यांसाठीची प्रतीक्षा यादी कायम ठेवली जाणार आहे. यामुळे जसजशा जागा रिक्त होतील, तसतसे प्रतिक्षा यादीतील क्रमानुसार बदली आदेश दिले जाणार आहेत. मात्र, सध्या तरी आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना नवीन अर्ज करण्यास संधी मिळणार नसल्याचे प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी सांगितले.

 

शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करण्यासाठी ६ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. ऑनलाइन पद्धतीने सर्व अर्ज घेण्यात आले. ३० जून २०२३ ला बदलीस पात्र असतील, त्या शिक्षकांनाच अर्ज करण्याची संधी दिली होती. तसेच बदलीपात्र असलेल्या शिक्षकांसाठी बिंदुनामावली प्रसिद्ध करण्याची आणि अवलोकन करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरून करण्यात आली. बदलीच्या ऑनलाईन पोर्टलवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील बदलीसाठी ही प्रक्रिया राबवली. त्यासाठी शिक्षकांना संकेतस्थळावर लॉगीन आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून दिला होता. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय शासनाच्या ७ एप्रिल २०२१ च्या निर्णयानुसार राबवण्यात आला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56
Next Post

संभाजीनगर हादरलं! पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; आरोपी एका मुलाचा बाप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.